Wed, Jun 26, 2019 01:47होमपेज › Nashik › नाशिक : भाजपने ५ मिनीटात महासभा गुंडाळली (video) 

नाशिक : भाजपने ५ मिनीटात महासभा गुंडाळली (video)

Published On: Feb 22 2019 2:07PM | Last Updated: Feb 22 2019 2:59PM
नाशिक : प्रतिनिधी 

नाशिक महापालिकेची तहकुब करण्यात आलेली महासभा आज (ता.२२) शुक्रवारी घेण्यात आली. यावेळी शिवसेनेसह इतर विरोधी पक्षातील काही नगरसेवकांनी करवाढी विरोधात गोंधळ घातल्याने सत्ताधारी भाजपाने ही सभा ५ मिनिटांत गुंडाळली.

सभेच्या प्रारंभी करवाढीविरेाधातील लक्षवेधीवर विरोधी पक्षांनी चर्चा करण्याची विनंती केली. परंतू अशी कोणतीही लक्षवेधी मिळाली नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. त्यानंतर शिवसेनेसह इतर विरोधी पक्षातील काही नगरसेवकांनी महापौरासमोर येऊन गोंधळ घातला. महापौरांनी या गोंधळातच सर्व विकासकामे मंजूर झाल्याचे स्पष्ट करत राष्ट्रगीताला प्रारंभ केला. त्यामुळे अवघ्या पाच मिनीटाच सत्ताधारी भाजपाने ही महासभा गुंडाळली. 

त्यानंतर आक्रमक विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी नगरसचिव कार्यालयातील रिकामी खुर्ची टेबलवर टाकून पळकुट्या नगरसचिवांचा धिक्कार असो, प्रशासन आणि भाजपाचा तीव्र शब्दात निषेध केला. याप्रसंगी मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, नगरसेवक विलास शिंदे,गजानन शेलार,  सुधाकर बडगुजर, मनसेचे नगरसेवक सलीम शेख, गुरूमीत बग्गा, मुशीर सय्यद आदी उपस्थित होते.