Sat, Jul 04, 2020 18:26होमपेज › Nashik › नाशिक : उगावातील 'तो' कोरोनाग्रस्त बरा होऊन घरी परतला (video)

नाशिक : उगावातील 'तो' कोरोनाग्रस्त बरा होऊन घरी परतला (video)

Last Updated: May 29 2020 3:00PM
निफाड : पुढारी वृत्तसेवा

निफाड तालुक्यातील उगांव येथील कोरोनाग्रस्त रूग्णाला पुर्णपणे बरा झाल्यावर जिल्हा शासकिय रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्याचे उगांव येथे आगमन होताच ग्रामस्थांनी पुष्पवर्षाव करून त्‍याचे स्वागत केले. 

14 मे 2020 रोजी मुंबई ठाणे येथुन उगावला आलेल्या या रूग्णाला अगोदरपासून ताप होता, म्हणुन त्याने उगावला प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून घेतली. यावेळी उगांवचे सामुदाय आरोग्य अधिकारी डॉ. कलिम पठाण यांनी त्‍याला पिंपळगांव बसवंत येथे पाठवले. तेथे त्‍याला क्‍वारंटाईन करण्यात आले. दरम्‍यान 18 मे रोजी त्‍याला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्रात्‍प झाला. 

यानंतर नाशिक येथे जिल्हा शासकिय रूग्णालयात त्‍याच्यावर उपचार करण्यात आले. सुरुवातीच्या तीनच दिवसात त्याची प्रकृती सुधारली. उपचारादरम्यान रूग्णालयातील डॉक्‍टरांची सुश्रृषा करण्याची पध्दत, औषधोपचार, कर्मचाऱ्यांकडून नियमित दिला जाणारा नाष्‍टा, जेवण ही सुविधा प्रशंसनीय होती, असा अनुभवही या रूग्णाने यावेळी सांगितला. दहा दिवस उपचारानंतर सदर रूग्णास रूग्णवाहिकेद्वारे उगांव येथे आणल्यावर स्थानिक ग्रामस्थांनी त्याचे फुलांच्या वर्षावात स्वागत केले. तलाठी आर. बी. गायकवाड़ यांनी पुष्पहार घालून त्‍याचे स्वागत केले.