होमपेज › Nashik › अपक्ष उमेदवाराने अनामत रक्‍कम म्‍हणून भरली १० हजाराची चिल्‍लर, अधिकारी थक्‍क 

...अन् उमेदवाराने भरली १० हजाराची चिल्‍लर

Published On: Apr 09 2019 3:36PM | Last Updated: Apr 09 2019 3:33PM
नाशिक : प्रतिनिधी 

नाशिक लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार शिवाजी वाघ यांनी निवडणुकीसाठी अनामत रक्कम भरण्यासाठी चक्क 10 हजारांची चिल्लर आणली. त्यांनी अनामत रकमेत चिल्लर असल्याची माहिती देताच अधिकारी थक्क झाले.

नाशिक लोकसभा मतदारसंघात अर्ज भरण्यासाठी मंगळवारी (दि.9) दुपारी 3 वाजता अखेरची मुदत होती. मुदत संपण्याअगोदर अर्धा तास अगोदर म्हणजे अडीच वाजता वाघ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या दालनात प्रवेश केला. दरम्यान, अनामत म्हणून आणलेली रक्कम तपासून मगच भरावी, अशा सूचना अधिकाऱ्यांनी वाघ यांना दिल्या. त्यावर वाघ यांनी दालनातच ठाण मांडत चिल्लर मोजण्यास सूरवात केली.

यामुळे जिल्‍हाधिकाऱ्यांच्या दालनात अधिकारी आवाक आणि शिवाजी वाघ चिल्‍लर मोजण्यात मग्‍न होते. यामुळे दालनात हा चर्चेचा विषय ठरला.