Sun, May 31, 2020 02:38होमपेज › Nashik › नाशिक :जायकवाडी धरणाच्‍या पाणपातळीत वाढ, गोदावरीत १२ हजार क्यूसेकने विसर्ग

नाशिक :जायकवाडी धरणाच्‍या पाणीपातळीत वाढ, गोदावरीत १२ हजार क्यूसेकने विसर्ग

Published On: Sep 16 2019 12:27PM | Last Updated: Sep 16 2019 12:27PM

नाशिक : गोदावरी पात्रात पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढला.वडीगोद्री (जि.जालना) : प्रतिनिधी 

पैठण जायकवाडी धरणाची पाणीपातळी ९९.७८% झाली असून नाथसागराच्या धरणाचे १६ दरवाजे अर्ध्या फुटाणे वर उचलल्याने धरणामधून गोदावरी पात्रात १२ हजार ६९ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्याचबरोबर डावा कालव्यात १२०० क्यूसेक तर उजव्या कालव्यात ७०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

या धरणाचे गेट क्र. १० व २७ एक फुटाने उघडले तर ११, १३, १४, १५, १६, १७, २०, २१, २२,  २३, २४, २५,  २६,  हे अर्ध्या फुटाने उघडले आहेत. पैठण धरणात १७ हजार ९७ दलघमीने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या धरणात एकूण पाणीसाठा हा २९०४.२६५ दलघमी व  जिवंत पाणीसाठा हा २१६०.१५९ दलघमी इतका आहे.

अंबड तालुक्यातील शहागड गोदावरी पात्रात पाणी आले असून पाणी पातळीत बऱ्यापैकी वाढ झाली आहे. वडीगोद्री येथील डाव्या कालव्यात पाणी आले असून पुन्हा डावा कालवा तुडूंब भरणार आहे. या पाण्यामुळे वडीगोद्री व शहागड परिसरातील गावांना मोठा फायदा होणार आहे. आता हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येणार असून यामुळे शेतकरी वर्गात आनंद व्यक्त होत आहे. यामुळे पैठण धरण हे अंबड तालुक्यासाठी मोठे वरदानच आहे अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्‍यक्‍त होते आहे.