Sun, May 31, 2020 21:39होमपेज › Nashik › भुसावळमध्ये डॉक्टरच निघाला पॉझिटिव्ह

भुसावळमध्ये डॉक्टरच निघाला पॉझिटिव्ह

Last Updated: May 23 2020 7:51PM

संग्रहित छायाचित्रजळगाव : पुढारी ऑनलाईन

भुसावळमधील २५१ कोरोना संशयितांचे अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी २५० कोरोना संशयितांच्या रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पण एका ३० वर्षीय डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मागील दोन दिवसांपासून भुसावळमध्ये कोणतेही अहवाल प्राप्त झाले नव्हते. दरम्यान, आज (ता.२३) जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली. 

यानुसार भुसावळ येथील गंगाराम प्लॉट, प्रोफेसर कॉलनी, शनी मंदिर, रामदासवाडी व इतर ठिकाणच्या २५१ कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी २५० व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एका ३० वर्षीय डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या ३८२ झाली आहे.

दरम्यान, आज निगेटीव्ह आलेले सर्व संशयित हे भुसावळमधील आहेत. मागील काही दिवसांपासून भुसावळ शहरासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होता. दरम्यान, एकाच वेळी अडीचशे रूग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने भुसावळकरांनी सुटकेचा निश्‍वास सोडला आहे.