Sat, Jul 11, 2020 12:37होमपेज › Nashik › भुसावळमध्ये भाजप नगरसेवकाच्या घराबाहेर गोळीबार

भाजप नगरसेवकाच्या घराबाहेर गोळीबार

Published On: Feb 25 2019 2:12PM | Last Updated: Feb 25 2019 2:14PM
जळगाव : प्रतिनिधी

भुसावळ शहरातील भाजपचे नगरसेवक रवींद्र उर्फ हम्प्या बाबूराव खरात यांच्या समता नगर भागातील एका गटातील जमावाने प्रचंड दगडफेक केली. या दगडफेकीत एकजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या दगडफेकीत योगेश हिरालाल मोघे हा जखमी झाला. रविवार (दि.२४) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. तर यावेळी गोळीबार देखील करण्यात आला होता. घटनास्थळावर बंदुकीची गोळी आढळून आली आहे, मात्र ज्या पिस्तूलमधून गोळीबार झाला आहे ती मिळाली नसल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक लोहित मतांनी यांनी दिली.

या प्रकरणी नगरसेवक खरात यांच्यासह चौघांना शहर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे. 

रवींद्र खरात यांच्या समता नगर भागातील घराजवळ मध्यरात्री 2 ते 2.30 वाजेच्या सुमारास नरेंद्र उर्फ बाळा मोरे तसेच दुसर्‍या गटातील राहुल उर्फ बाळा सोनवणे, गिरीश तायडे यांच्यात काही कारणावरून वाद झाला. यावेळी जमावाने खरात यांच्या चारचाकी वाहनासह दुचाकीची मोडतोड करत दगडफेक केली. या दगडफेकीत योगेश मोघे हा जखमी झाला. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

दरम्यान, घटनास्थळावरून पोलिसांना बंदुकीच्या गोळी  मिळाल्या आहेत. मात्र अप्पर पोलिस अधीक्षक मतानी यांनी मात्र गोळीबार झाला का नाही याचा तपास सुरू असून २४ तासात नेमके स्पष्ट होईल असे सांगितले. तर रवींद्र खरात, नरेंद्र मोरे, राहुल सोनवणे, गिरीश तायडे यांना ताब्यात घेतल्याचे सांगितले.