होमपेज › Nashik › नाशिकमध्ये डान्सबारला परवानगी देऊ नये

नाशिकमध्ये डान्सबारला परवानगी देऊ नये

Published On: Jan 19 2019 1:37AM | Last Updated: Jan 19 2019 1:08AM
पंचवटी : वार्ताहर

तरुण पिढीसह अनेकांच्या संसाराचा विचार करता नाशिकमध्ये डान्सबारला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिले आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, आघाडी सरकारच्या काळात 13 वर्षांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी डान्सबारवर बंदी आणली होती. मात्र, युती सरकारने सर्वोच्च न्यायालयात डान्सबारवरील विरोध प्रखरपणे न मांडल्यामुळे सरकारची बाजू कमकुवत राहिली व राज्यात पुन्हा एकदा डान्सबार सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. यामुळे डान्सबारच्या नावाखाली अनेक अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात दुष्काळ असल्याने शेतमजूर तसेच सुशिक्षितांपुढे रोजंदारीचा प्रश्‍न असताना याबाबत उपाययोजना करण्याऐवजी डान्सबार सुरू करण्याला सरकार प्राधान्य देत आहे. दरम्यान, नाशिकमध्ये डान्सबारला परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

या प्रसंगी अ‍ॅड.चिन्मय गाढे, नीलेश सानप, डॉ.संदीप चव्हाण, संतोष भुजबळ, सागर बेदरकर, सुनील घुगे, भूषण गायकवाड, नदीम शेख, मितेश राठोड, जयभाऊ कोतवाल, रोहित जाधव, राज रंधावा, संतोष पुंड आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex