Fri, Jun 05, 2020 00:59होमपेज › Nashik › सुरक्षा रक्षक कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश राऊत यांची आत्महत्या 

सुरक्षा रक्षक कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश राऊत यांची आत्महत्या 

Published On: May 16 2019 2:57PM | Last Updated: May 16 2019 2:54PM
सातपूर : प्रतिनिधी 

भाजपा कामगार मोर्च्याशी संलग्न महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक कामगार संघ नाशिकचे जिल्हाध्यक्ष निलेश राऊत (वय ३३ रा. स्वारबाबानगर, सातपूर) यांनी आज (दि.१६ मे) रोजी पहाटे ५ ते ६ वाजेच्या दरम्यान गळफास घेवून आत्महत्या केली. 

कौटुबिंक मानसिक, नैराश्य, तानतणाव यामुळे निलेश राऊत यांनी आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात आहे. निलेश राऊत हे शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच सातपूर पोलिस स्टेशन शांतता समितीचे सदस्य देखील होते. नाशिक जिल्हामधील नाशिक मनपा, जिल्हापरिषद, एमएससीबी, बँक एटीएम, कारखाने हॉस्पिटल अशा ठिकाणी असंघटीतपणे वेगवेगळ्या आस्थापनामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच कामगार उपायुक्त कार्यालय असो अथवा संबधित अस्थापनामध्ये आंदोलने व सामंजस्यची भूमिका घेवून त्याचे प्रश्न सोडविण्याचे महत्वपूर्ण काम ते करीत होते. 

त्यांच्या पश्च्यात आई, पत्नी, पाच वर्षाचा मुलगा,दोन भाऊ असा परिवार आहे. राऊत यांच्या कुटुबांचे सांत्वन करण्यासाठी यावेळी कामगार उपायुक्त गुलाबराव दाभाडे, आमदार सीमा हिरे, नितीन निगळ, विक्रम नागरे आदींसह  भाजपाचे पाधिकारी व मित्रपरिवार उपस्थित होते.