Mon, Nov 20, 2017 17:25होमपेज › Nashik › नाशिक : ५ खुनांसह १५ गुन्ह्यांतील आरोपीला अटक (व्हिडिओ)

नाशिक : ५ खुनांसह १५ गुन्ह्यांतील आरोपीला अटक (व्हिडिओ)

Published On: Nov 14 2017 3:43PM | Last Updated: Nov 14 2017 3:50PM

बुकमार्क करा

पंचवटी : देवानंद बैरागी 

नाशिकमध्ये  ५ खूनांसह १५ गुन्ह्यातील आरोपी असलेल्याला पंचवटी पोलिसांनी अटक केली. उत्तर प्रदेशातील एका मंदिरात दरोडा आणि दोन खून करून नाशिकमध्ये लपलेला असगर बदलू शेख (वय २६) याला पोलिसांनी अटक केली आहे.  

उत्तर प्रदेश येथे मंदिरात दरोडा टाकून तेथील पुजाऱ्याचा आणि आपल्या पत्नीसह ५ खुनांच्या आणि इतर १५ गुन्ह्यांत असगर शेख फरार होता. या आरोपीला पंचवटी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने सोमवार (दि.१३) रोजी रात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले.

या आरोपी बाबत उत्तर प्रदेश पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश येथील पोलिसांचे पथक या आरोपीचा ताबा घेण्यासाठी रवाना झाले असल्याची माहिती पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी दिली आहे .