Sat, Jul 04, 2020 10:02होमपेज › Nashik › नाशिक : कोरोनाबाधित पोलिस हवालदाराचा मृत्यू

नाशिक : कोरोनाबाधित पोलिस हवालदाराचा मृत्यू

Last Updated: Jul 01 2020 11:31AM

पोलिस हवालदार अरुण टोंगारेनाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहर पोलिस दलातील कोरोनाबाधित पोलिस हवालदार अरुण टोंगारे यांचा उपचारादरम्यान आज बुधवारी (दि. १) रोजी सकाळी मृत्यू झाला. शहर पोलिस दलातील हा पहिलाच मृत्यू आहे. 

वाचा  : नाशिकमध्ये कठोर लॉकडाऊन

अरुण टोंगारे हे इंदिरानगर पोलिस ठाण्यात सध्या कार्यरत होते. १२ जून रोजी अस्वस्थ वाटत असल्याने ते खासगी रुग्णालयात दाखल झाले. तेथे त्यांची कोरोना चाचणी केली असता ते कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्याची आणखी तब्येत खालावली. यानंतर त्यांना मुंबई येथे उपचारासाठी नेले. मात्र तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

वाचा  : जिल्ह्यात २०९ नवे रुग्ण; ४ मृत्यू

शहरातील चार पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील दोघे कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला. पोलिस हवालदार अरुण टोंगारे हे न्यायालयाचे समस बजावण्याचे काम करीत होते. तसेच लॉकडाऊन काळात प्रतिबंधीत क्षेत्रात अरुण टोंगारे यांनी कर्तव्य बजावले होते. त्यानंतर सुमारे वीस दिवसापूर्वी त्यांची तब्येत बिघडली म्हणून ते रजेवर गेले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.