Tue, Sep 17, 2019 04:05होमपेज › Nashik › औरंगाबाद हिंसाचार अचानक उसळला नाही: अजित पवार

औरंगाबाद हिंसाचार अचानक उसळला नाही: अजित पवार

Published On: May 14 2018 3:20PM | Last Updated: May 14 2018 3:20PMनाशिक : प्रतिनिधी

भीमा- कोरेगाव दंगलीमागचा मास्टर माइंड शोधायला हवा. औरंगाबाद येथील हिंसाचार अचानक उसळलेली नाही. तेथील लोकांमध्ये खदखद होती. सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले असून, भीमा कोरेगाव व औरंगाबाद दंगल या दोन्ही घटना सरकारचे अपयश असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. विधान परिषदेचे उमेदवार शिवाजी सहाणे यांच्या प्रचारासंदर्भात आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

पवारांनी घेतले बडी दर्गाचे दर्शन

व्दारका : वार्ताहर

विधान परिषदेचे उमेदवार शिवाजी सहाणे याच्या प्रचारासाठी नाशिक येथे आलेली माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुने नाशीक परिसरातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळास पुष्पहार अर्पण केला. शादिक शहा हुसेनी बाबा (बडी दर्गा ) येथे जाऊन दर्शन घेतले. यावेळी उमेदवार शिवाजी सहाने, जयंत जाधव, अपुर्व हीरे, गजानन शेलार, अर्जुन टिळे आदी उपस्थीत होते. 


 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex