Sat, Jul 04, 2020 16:55होमपेज › Nashik › जळगावच्या कोविड-१९ रुग्णालयातून रूग्ण गायब!

जळगावच्या कोविड-१९ रुग्णालयातून रूग्ण गायब!

Last Updated: Jun 07 2020 8:12AM

संग्रहित छायाचित्रजळगाव : पुढारी वृत्तसेवा 

भुसावळ येथील ८२ वर्षीय आजीबाई जळगावच्या कोविड १९ रूग्णलयातून गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता झाल्या आहेत. यावरून रूग्णलयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून रुग्ण बेपत्ता झाल्याबाबत अधिष्टाता यांना काहीच माहिती नाही अशी अवस्था आहे. तसेच रूग्णल्यातून रूग्ण बेपत्ता झाला कसा हा मोठा प्रश्न आहे. याबाबत पोलिसांत रूग्ण बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली आहे. भुसावळ येथील आजी बाई भुसावळ येथील रेल्वे रूग्णालयात भरती होत्या. १ जून रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जळगाव येथील कोविड १९ रूग्णलयात हलविण्यात आले होते. 

जळगाव जिल्ह्यातील नियंत्रण कक्ष वाऱ्यावर 

आजी कोविड-१९ रुग्णालयात भरती असल्याने पुणे येथील नातवाने २ जून रोजी फोन करून जळगाव कोविड-१९ रुग्णालयात विचारणा केली. त्यावेळी गेल्या चार दिवसांपासून आजी बेपत्ता आहे, अशी माहिती देण्यात आली. यामुळे नातवाने पुन्हा ३ रोजी माहिती घेतली असता रूग्णलयाकडून चुकून आजीला कोरोना संशयितांच्या कक्षात दाखल केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पुणे येथील नातवाने हा माहिती नातेवाईकांना दिली. अखेर याबाबत नातेवाईकांनी शनिवारी कोविड-१९ रुग्णालयातून आजी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी खासगी रूग्णालयात सुध्दा तपासले मात्र आजी मिळून आलेल्या नाही.

 जळगाव जिल्ह्यात 2 दिवसांत 21 मृत्यू

यावरून जळगावच्या कोविड-१९ रूग्णलयात नावपासून सुरू झालेला घोळ समोर आला असून रुग्णालयाची सुरक्षा यंत्रणा किती चागली आहे हे ही समोर आले आहे. याबाबत अधिष्टाता यांना काहीच माहित नाही हे न पटणारे आहे.