Tue, Sep 17, 2019 04:50होमपेज › Nashik › नाशिकमध्ये पोलिसांच्या वाहनाला अपघात; १६ जखमी

नाशिकमध्ये पोलिसांच्या वाहनाला अपघात; १६ जखमी

Published On: Dec 31 2018 4:26PM | Last Updated: Dec 31 2018 4:26PM
कळवण: प्रतिनिधी   

नाशिक ग्रामीण पोलिस मुख्यालयातून कळवण येथे बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला आठंबे शिवारात अपघात होऊन १६ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. यापैकी चार पोलिस कर्मचाऱ्यांना डोक्याला व हातापायाला दुखापत झाल्याने प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिक येथील खासगी अपोलो रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. 

नवीन वर्षाचे स्वागत व भिमा कोरेगाव प्रकरणी कळवण येथे बंदोबस्तासाठी नाशिक ग्रामीण पोलिस मुख्यालयातून वाहन क्रमांक एमएच १५ ए ए ३०६७ मधून चालक व १५ कर्मचारी एकूण सोळा कर्मचारी येत होते. या वाहनाला आठंबे शिवारात दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास गाडी पलटी होऊन अपघातात १६ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. पैकी चार पोलिस कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिक येथील खासगी अपोलो रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

या अपघाताची माहिती कळवण येथील सीए गालिब मिर्झा यांनी भ्रमणध्वणीवरून अभोणा येथील पोलिस कर्मचारी बबनराव पाटोळे यांना दिली. पाटोळे यांनी ही माहिती तात्काळ कळवण पोलिस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांना दिली. त्यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधत रुग्णवाहिका व मिळेल त्या खासगी वाहनांनी सर्व जखमींना कळवण उपजिल्हा रुग्णालयात आणले. त्यापैकी पाच जण अमरसिंग छोटूसिंग हजारी (वय ५६), चंद्रकांत शंकर माळी (वय ५३), निंबाजी सोमा जगताप (वय ५६), काशिनाथ एकनाथ पवार (वय ४३), किशोर वामन भांगरे (वय ४०)  यांना अधिक उपचारासाठी नाशिक येथील अपोलो रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. 

अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपअधिक्षक सदाशिव वाघमारे उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन घटनेची माहिती घेतली व जखमींना तात्काळ उपचार मिळण्यासाठी पोलिस निरीक्षक मांडवकर, उपनिरीक्षक विनोद जाधोर , पोलिस कर्मचारी मधुकर तारू, हिमंत चव्हाण, निकम, परदेशी, ब्राम्हणे, कडाळे आदीनी प्रयत्न केले. उपजिल्हा रुग्णालयात जखमीवर डॉ. प्रवीण बागुल, परिचारिका पी. एच. मगर, भक्ती, सुर्यवंशी यांनी उपचार केले. 

कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी पोलिसांची नावे पुढीलप्रमाणे - दशरथ परशराम बोरसे (वय ४८), भास्कर माधवराव देशमुख (वय ४९), चैतन्य बालाजी सपकाळे (वय ५३), दत्तू बालाजी सानप (वय ५४), मनोहर पांडुरंग केदारे (वय ५४), बाळू काशिनाथ लोंढे (वय ५२), बाळासाहेब निवृत्ती शिंदे (वय ४०), राजू कचरू वाघ (वय ५३), रमेश सखाराम चौधरी (वय ५४), अनिल सजन कोकाटे (वय ५०),  अनिकेत सुनिल मोरे (वय २६) आदी आहेत.  
  

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex