Fri, Apr 26, 2019 20:06होमपेज › Nashik › 'कोणत्याही परिस्थितीशी मुकाबला करण्यास भारतीय लष्कर सज्ज' (VIDEO)

'कोणत्याही परिस्थितीशी मुकाबला करण्यास भारतीय लष्कर सज्ज' (VIDEO)

Published On: Nov 09 2018 2:55PM | Last Updated: Nov 10 2018 1:21AMनाशिक : प्रतिनिधी 

केंद्र सरकार गेल्या चार वर्षांपासून लष्कराचे आधुनिकीकरण करीत असून, त्याचाच एक भाग म्हणून अमेरिकेकडून १४५ तोफा खरेदी केल्या जाणार आहेत, त्यामधील १२५ तोफा आपल्या देशात निर्माण केल्या जाणार असून, त्यासाठी ७३७ मिलियन यूएस डॉलर्स खर्च अपेक्षित आहे, यापुढे भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीशी मुकाबला करण्यास सज्ज असल्याचे प्रतिपादन संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले.

देवळालीमधील आर्टीलरी सेंटर हे आशिया खंडातील सर्वात मोठे तोफखाना केंद्र आहे. संरक्षणमंत्री सीतारामन यांच्या हस्ते के-9 वज्र आणि अल्ट्रा लाईट हॉवित्झर गन आणि संयुक्त गन टॉवरचे राष्ट्रार्पण करण्यात आले. सीतारामन यांनी यावेळी सांगितले की, या दोन्ही गनमुळे देशाची लष्करी क्षमता वाढली आहे. दक्षिण कोरियाकडून १०० वज्र तोफा घेणार आहे. यासाठी ४ हजार ३६७ कोटी रुपये खर्च येणार असून यामधील ९० तोफा आपल्या देशात निर्माण करण्यात येणार आहेत. 

या लोकार्पण सोहळ्यानिमित्त सीतारामन यांच्या उपस्थितीमध्ये लष्करी जवानांनी चित थरारक प्रात्यक्षिके सादर केली. त्यामुळे युध्दाची अनुभूती आली. भारतीय लष्करात १९८६ मध्ये बोफोर्स तोफा दाखल झाल्या होत्या. त्यानंतर ३० वर्षांनी हॉवित्झर आणि वज्र या अत्याधुनिक तोफा लष्करात दाखल झाल्या. भारताच्या पाक आणि चीनच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी या दोन्ही तोफा खुप उपयुक्त ठरणार आहेत. या तोफांमुळे भारतीय लष्कराचा दबदबा वाढणार आहे. १५५ मिमी, ३.९ कॅलिबर अल्ट्रा लाइट हाऊट्झर्स सरकारकडून विदेशी परदेशी सैन्य विक्री अंतर्गत विकत घेतले गेले आहेत आणि बीएई सिस्टम्सद्वारे खासगी भागीदारीमध्ये भारतात एकत्र केले जाईल. 

गन सिस्टम बहुमुखी, हलकी वजनाची आणि हीलिची उचलली जाऊ शकते, यामुळे देशामध्ये उपलब्ध असलेल्या विविध भूभागांमध्ये रोजगारामध्ये आवश्यक लवचिकता प्रदान केली जाऊ शकते. हॉविट्जर अमेरिकेत, कॅनेडियन, ऑस्ट्रेलियन आणि काही इतर सैन्यामध्ये सेवा देत आहे. अफगाणिस्तान आणि इराकच्या कठीण भागांमध्ये हे त्याचे लक्ष वेधले आहे.पश्चिम विभागातील भारतीय सैन्याच्या फायरवॉवर क्षमतेस मोठ्या प्रमाणात भर देण्यात येणार आहे.


के९ वज्र या तोफेची खासियत 
 किंमत ४ हजार ३६६ कोटी रुपये 
२८ ते ३८ किमी अंतरापर्यंत मारा करू शकते 
 अवघ्या ३० सेकंदामध्ये तीन गोळे मारण्याची क्षमता 
तीन मिनीटात १५ गोळांचा मारा करू शकते  
एकुण १०० तोफांपैकी नोव्हेंबर २०१९ पर्यंत ४० के९ तोफांचा समावेश लष्करात होणार
उर्वरित ५० २०२० पर्यंत समावेश केल्या जातील. चालू महिन्यात  १० तोफांचा समावेश होईल
भारताच्या प्रायव्हेट सेक्टरमधून तयार झालेली ही पहिलीच तोफ आहे 

एम७७७ होवित्झर तोफ 
अत्याधुनिक एम७७७ तोफ ३० किमीपर्यंत मारा करू शकते. 
गरजेनुसार हेलिकॉप्टर आणि विमानाच्या माध्यमातून कोठेही वाहून नेता येणार 
या तोफेच्या सात रेजिमेंट केल्या जातील. 
५२ कॅलिबरच्या एम७७७ तोफांचा वापर अमेरिका कॅनडा, ऑस्ट्रेलिया करत असून आता या यादीमध्ये भारताचा समावेश