Wed, Jul 24, 2019 08:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सी लिंकवरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

सी लिंकवरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

Published On: Jul 12 2019 7:29PM | Last Updated: Jul 12 2019 7:29PM
मुंबई : पुढारी ऑनलाइन 

वांद्रे-वरळी सी-लिंकवरून समुद्रात उडी घेऊन एका तरुणाने आत्महत्या केली. पार्थ सोमाणी (वय, २५) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. 

पार्थ मुलुंड येथील रहिवासी असून तो एका सीए फर्ममध्ये नोकरी करत होता. शुक्रवारी दुपारी तो टॅक्सीने वांद्रे-वरळी सी-लिंकवर आला. त्याने अचाणकच टॅक्सी थांबवण्यास सांगितली आणि समुद्रात उडी घेतली. नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना देली. माहिती मिळताच पोलिस घटणास्थळी दाखल झाले आणि  पार्थचा शोध घेण्यासाठी तटरक्षक दलाला पाचारण करण्यात आले. तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर सायंकाळी उशिरापर्यंत या तरुणाचा समुद्रात शोध घेत होते, परंतु उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नाही. 

दरम्यान, सायंकाळी साडेसहा वाजता सूर्यास्तामुळे शोध मोहिमेत अडचणी येत असल्यामुळे शोध थांबवण्यात आला. उद्या सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू होईल, अशी माहिती तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.