Mon, Sep 16, 2019 11:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कपडे बदलताना महिलेचा व्हिडीओ 

कपडे बदलताना महिलेचा व्हिडीओ 

Published On: May 18 2019 1:45AM | Last Updated: May 18 2019 1:45AM
मुंबई : अरुण सावरटकर 

अंधेरीतील एका खाजगी कंपनीत छुप्या मोबाईलद्वारे रेकार्डिंग सुरु ठेवून महिलांचे कपडे  बदलताना अश्‍लील व्हिडीओ काढण्याचा धक्कादायक प्रकार एका महिला कर्मचार्‍याच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच कंपनीचा हाऊसकिपिंगचे काम करणार्‍या गणेश इतवार नडगे या 37 वर्षीय कर्मचार्‍याला सहार पोलिसांनी अटक केली आहे. 

नडगेकडून पोलिसांनी एक मोबाईल जप्त केला असून त्यात या महिलेचे दहा मिनिटांचे व्हिडीओ मोबाईलवर रेकॉडिंग झाल्याचे उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला पंधरा हजार रुपयांचा जामीन झाल्याची माहिती एका अधिकार्‍याने दिली.

तक्रारदार तरुणी ही 27 वर्षांची असून ती अंधेरी येथे राहते. अंधेरी परिसरातील एका खाजगी कंपनीत ती पेस्टी शेफ म्हणून कामाला आहे. तिथे पेस्टी साहित्य बनविण्याचे प्रशिक्षण देण्याचे ती काम करते. कंपनीच्या पहिल्या मजल्यावर पुरुष आणि महिला कर्मचार्‍यांसाठी एक स्वतंत्र चेजिंग रुम तयार करण्यात आली आहे. या रुमचा पुरुषासह महिला कर्मचारी वापर करतात.

गुरुवारी सकाळी सव्वाआठ वाजता सदर तरुणी कामावर आली होती. काम करताना ती पावणेदहा वाजता चेजिंग रुममध्ये गेली. तिथे केस सेटअप करताना ती तिच्या एका मित्राशी गप्पा मारीत होती. यावेळी तिला रुमच्या खिडकीजवळ एक मळकट कपडा दिसून आला. या कपड्याच्या आतमध्ये एक मोबाईल ठेवण्यात आला होता. हा मोबाईल हातात घेतल्यानंतर तिला मोबाईलचे रेकॉडिंग सुरू असल्याचे दिसून आले. तिने गॅलरीमध्ये जाऊन पाहणी केल्यानंतर तिचे दहा मिनिट बारा सेकंटचा व्हिडीओ रेकॉडिंग झाल्याचे दिसून आले. या प्रकाराने तिला धक्का बसला. त्यानंतर तिने हा मोबाईल घेऊन वरिष्ठांना ही माहिती दिली. 

गुन्हा दाखल होताच गणेशला गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याला पंधरा हजार रुपयांचा जामीन मंजूर करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. गणेश हा सध्या गोरेगाव येथील आरे कॉलनी, खांबाचा पाडा, युनिट 25 मध्ये राहतो. गुरुवारी या 
तरुणीच्या सतर्कमुळे हा प्रकार उघडकीस आला असून हा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे, तो फॉरेेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आला आहे.