होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईतील पाणीपट्टीत ३.७२ टक्के वाढ

मुंबईतील पाणीपट्टीत ३.७२ टक्के वाढ

Published On: Jun 14 2018 6:29PM | Last Updated: Jun 14 2018 6:29PM



मुंबई : प्रतिनिधी

मुंबईतील पाणीपट्टीत ३.७२ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे झोपडपट्टीतील पाणी दरात प्रती हजार लिटर्स ४.०८ रूपयावरून ४.२३ रूपये होणारा आहे. 

अन्य घरगुती पाण्याच्या दरात ४.९१ रूपयावरून ५.०९ रूपये, व्यावसायिक दरात ३६.८८ रूपयावरून ३८.२५ रूपये वाढ होणार आहे. त्यावर ७० टक्के मलनि:सारण शुल्क आकारले जाणार आहे.