Mon, Sep 16, 2019 06:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ...तर भाजपची सर्व कार्यालये फोडू : भीम आर्मीचा इशारा

...तर भाजपची सर्व कार्यालये फोडू : भीम आर्मीचा इशारा

Published On: May 23 2019 1:42AM | Last Updated: May 23 2019 1:19AM
मुंबई ः 

सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा पराभव झाल्यास सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे एकही कार्यालय ठेवणार नाही, असा इशारा भीम आर्मी संघटनेने दिला आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी या इशारानंतर शांततेचे आवाहन केले आहे.

सोलापूर मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, भाजपचे डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य आणि वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत रंगली आहे. मात्र सोलापुरात ईव्हीएममुळे प्रकाश आंबेडकर हरले, तर याठिकाणी भाजपचे एकही कार्यालय ठेवणार नसल्याचा इशारा भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख अशोक कांबळे यांनी दिला आहे. कांबळे म्हणाले की, ईव्हीएममध्ये घोळ करून आंबेडकर यांचा पराभव केल्यास येथील भाजपाची सर्व कार्यालये तोडून टाकू.