Sat, Jul 04, 2020 10:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जाब विचारला म्हणून बदली थेट गुजरातला!

जाब विचारला म्हणून बदली थेट गुजरातला!

Last Updated: Jun 29 2020 10:21PM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरील अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका चालकाला ७२ तास राबवून घेत आहे. या बदल्यात कामगारांना सुरक्षा मिळत नसल्याबद्दल जाब विचारल्यामुळे माझी बदली थेट गुजरातला करण्यात आल्याचा आरोप रुग्णवाहिका चालकाने केल्यामुळे खळबळ उडाली आहे. मात्र विमानतळ प्राधिकरणात अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कंपनीने हा आरोप खोडून काढून बदली टाळण्यासाठी हा चालक असे आरोप करत असल्याचा खुलासा केला. 

अधिक वाचा : बिग ब्रेकिंग : टिकटॉक, यूसी ब्राऊझरसह चीन्यांच्या ५९ ॲपवर केंद्र सरकारकडून बंदी!

अत्यावश्यक सेवा पुरवण्याचे कंत्राट छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर ह्युमन केअर वर्ल्ड वाईड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आले आहे. त्यामध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, रुग्णांना रुग्णालयात पोहचवण्याचे काम देण्यात आले आहे. कोरोना काळातही हे जिकरीची काम तेथील कर्मचाऱ्याची करतात. त्यात विमानतळावर पोहचलेल्या रुग्णांना ते रुग्णालयातमध्ये पोहचवितात.

अधिक वाचा : अभियंत्यांनी परिवर्तनाचे अग्रदूत व्हावे : राज्यपाल

छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर एका रुग्णवाहिकेचा चालक म्हणून संतोष खरात काम करत आहेत. ह्युमन केअर वर्ल्ड वाईड कंपनीकडून त्यांची बदली गुजरातला करण्यात आली आहे. त्यावर संतोष खरात म्हणाले कि, चालकांना सध्या ७२ तास राबविले जाते. यातून झोप मिळत नाही. विमानतळाचा रन वे  तसेच विमान पार्किंगच्या बाजूला रुग्णवाहिका चालवणे भाग असल्याने जागरण झाल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. तसेच अत्यावश्यक सेवेत असून कोरोना रुग्णांना रुग्णालयात पोचवण्याचे कामही करावे लागत असून त्याबाबत कोणतेही इन्शुरन्स नसल्याचे ते सांगतात. या बाबत त्यांनी कंपनीला विचारले असता कंपनीने माझी बदली गुजरातला केली असल्याचे आरोप खरात यांनी केला. 

अधिक वाचा : 'वाखरी ते पंढरपूर पायी वारीला परवानगी द्या'

खरात यांनी या सर्व बाबींचे निवेदन लेबर कार्यालयात केले आहे. तसेच मार्च महिन्यात लेबर कार्यालयात हे कळविल्यानंतर त्यांचा बेसिक पगार वाढविण्यात आला. मात्र जाब विचारल्यावर त्वरित बेसिकमध्ये वाढ केल्याने आतापर्यंत बेसिक बाबतची माहिती का लपविण्यात आली याबद्दल त्यांनी विचारणा केली. तसेच माझ्या बदलीचे कारण सांगा म्हटल्यापासून आजतागायत कोणत्याही अधिकारी वा कर्मचाऱ्याने याबद्दल माहिती दिलेली नाही. मी कामाला कुठेही जाण्यास तयार आहे. ज्या ठिकाणी माझी बदली झाली आहे, त्या जागी सोय करणे गरजेचे आहे. मात्र सध्या कमी कामगार असताना केवळ जाब विचारल्याने माझी तडकाफडकी बदली करणे कितपत योग्य आहे असा सवाल खरात यांनी विचारला.

अधिक वाचा : टिकटॉक, पबजी ॲप वापरता? बातमी वाचाच!

ह्युमन केअर वर्ल्ड वाईड प्रा. लिमिटेड कंपनी कडून या आरोपाचे खंडन करण्यात आले. तसेच बदली टाळण्यासाठी हा कर्मचारी आरोप करत असल्याचे सांगण्यात आले. २०१८ साली खरात कामावर रुजू झाले. त्यानंतर त्यांना दिलेल्या अपॉइंटमेंट लेटरवर कधीही बदली करण्यात येऊ शकते अशा आशयाचा मुद्दा होता. तसेच शिस्तीवरून खरात यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. रुग्णवाहिका चालकांना कामगार कायद्याप्रमाणे मोबदला दिला जात आहे. २४ तासाची ड्युटी दिली असल्यास २४ तास सुटी दिली जाते. चालकाने अधिक तासाचे काम केल्यास त्याचा अधिक मोबदला दिला जातो. कामगार कायद्यान्वये कामगारांची सुरक्षा आणि मोबदला त्यांना दिला जात असल्याचे डॉ.खान यांनी सांगीतले. 

सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात गुजरातला जाण्याची तयारी असल्याचे खरात यांनी कळवले आहे. मात्र विमानतळ प्राधिकरकारणानेही कंपनीला जाब विचारणे आवश्यक असल्याचे खरात यांचे म्हणणे आहे. दरम्यान विमानतळावरून रुग्णालयात रुग्णांना पोचवण्याचे काम १८ रुग्णवाहिकाचालक करत आहेत. तसेच त्यांच्या सोबत १० मदतनीस असल्याचे सांगितले. दरम्यान विमानतळावर रुग्णवाहिका चालक पदावर काम करणाऱ्यांचा तुटवडा असून आपल्याला कामावर घेण्यात यावे, अशी मागणी ते करत आहेत. तसेच आपल्या आई, भाऊ, दोन मुली, पत्नीची जबाबदारी माझ्यावर आहे. मी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालविणार असा सवाल करत आत्महत्येशिवाय कोणताही पर्याय दिसत नसल्याचे खरात सांगतात.