Fri, Jan 24, 2020 04:53
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत उतरणार 'आप'; केजरीवाल करणार प्रचार!

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत उतरणार 'आप'; केजरीवाल करणार प्रचार!

Published On: Aug 24 2019 9:29AM | Last Updated: Aug 24 2019 9:29AM

file photoमुंबई : पुढारी ऑनलाईन

दिल्लीत सत्तेवर असलेल्या आम आदमी पार्टीने आता महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीतील रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. काल, शुक्रवारी आपने याची घोषणी केली.

आगामी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत 'आप' आपले उमेदवार उभे करणार आहे. उमेदवार निवडण्यासाठी एका समितीचीही स्थापना केली आहे. या निवडणुकीत आप अनेक जागांवर उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक नेते महाराष्ट्रातील विविध भागात प्रचार करणार असल्याचे 'आप'ने म्हटले आहे.

'आप'ने निवडणुकीत उतरण्याची घोषणा करताना म्हटले आहे, की महाराष्ट्र सरकार अनेक मोर्चांवर अयशस्वी ठरली आहे. अशा स्थितीत राज्यातील संकटग्रस्त लोकांच्या हितासाठी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

पक्षाच्या निर्णयाची माहिती देताना महाराष्ट्रातील 'आप'चे प्रदेश प्रभारी दुर्गेश पाठक यांनी भाजप आणि शिवसेना युती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पाठक यांनी म्हटले की, पाच वर्षापूर्वी तत्कालीन काँग्रेस सरकारला कंटाळून परिवर्तनासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकारच्या बाजूने जनादेश दिला. मात्र, हे सरकार देखील अयशस्वी ठरले.

त्यांनी पुढे म्हटले की, देशातील सर्वांत विकसीत राज्य मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आज पूर, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी आदी समस्या भेडसावत आहेत. राज्यात वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि आर्थिक मंदीमुळे विकासावर परिणाम झाला आहे. त्यावर आता उपाय शोधण्याची गरज आहे.