Fri, Jan 24, 2020 05:42
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › संकटावेळी परिवारच मागे उभा राहतो; सुप्रिया सुळेंचा दमानियांवर पलटवार

...म्हणून उद्धव ठाकरेंनी घेतली राज यांची बाजू: सुप्रिया सुळे

Published On: Aug 22 2019 2:44PM | Last Updated: Aug 22 2019 2:44PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे आज सकाळी ईडी कार्यालयात परिवारासह दाखल झाले. त्यांच्योबत पत्नी शर्मिला, मुलगा अमित ठाकरे होते. हे वृत्त समजताच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ED च्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला? असा प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या प्रश्नाला राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले. संकटावेळी परिवारच मागे उभा राहतो, असे सांगत दमानिया यांना चांगलेच खडसावले. 

ईडीची चौकशी म्हणजे राजकीय दबाव तंत्र आहे. जो कोणी आवाज उठवतो त्याचा आवाज दडपण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. संकटांवेळी परिवारच मागे उभा राहतो. त्यामुळे राज ठाकरेंसोबत त्यांचे कुटुंबीय गेले तर कोणी टीका करू नये, असे म्हणत दमानिया यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

तसेच, बाळासाहेबांचे संस्कार अजूनही जिवंत आहेत, यामुळेच उद्धव ठाकरे भाऊ राज ठाकरेंच्या पाठीशी उभे आहेत, असे म्हणत राज ठाकरेंच्या समर्थनार्थ त्यांनी आपली बाजू मांडली. तसेच, ईडीची चौकशी म्हणजे सरकारचे दबावतंत्र असल्याचेही सुळे यांनी म्हटले.  

दमानिया यांनी, 'राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ED च्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला? बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण? सगळे मिळून माहिती देणार का? काय हा drama? का सहानभुती गोळा करण्याचा हा प्रयत्न' असे ट्विट केले हाेते.