Wed, Oct 24, 2018 04:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › युती ही भाजपची मजबुरी नाही : मुनगंटीवार

युती ही भाजपची मजबुरी नाही : मुनगंटीवार

Published On: Apr 16 2018 4:38PM | Last Updated: Apr 16 2018 4:38PMमुंबई : प्रतिनिधी

आगामी निवडणुकांत युती व्हावी यासाठी कोणाचाही कुणावर दबाव नाही. युती ही भाजपाची मजबुरी नाही, शिवसेनेला जर वेगळं लढायचं असेल आणि त्यांची भूमिका भाजपला सोबत घ्यायचं नाही अशीच असेल तर आम्ही देखील वेगळं लढण्यासाठी तयार आहोत, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.  

युतीचा निर्णय भावनेवर आधारित नाही, तर तर्क व आकड्यांवर होईल, तुर्तास तरी या विषयावर दोन्ही बाजूच्या नेत्यांत कोणतीही चर्चा सुरु नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नाणार विषयी बोलताना ते म्हणाले की, नाणार प्रकल्प महाराष्ट्रात व्हायचा नसेल तर गुजरातला आंदण द्यायचा का? गुजरात 1 लाख रोजगार देणाऱ्या या प्रकल्पाचे स्वागतच करेल. या प्रकल्पामुळे पर्यावरणाचे नेमके काय आणि कितपत नुकसान होणार हे देखील समजून घेण्याची गरज असून केवळ विरोधाला विरोध नसावा असे आपले मत असल्याचे त्यांनी सांगितले.
 

Tags : state economics minister sudhir mungantiwar ,shivsenas, bjp, alliance