Mon, Sep 16, 2019 05:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘अंगणवाडी ताईंचा मेस्मा रद्द करा’ विधानपरिषदेत गोंधळ 

‘अंगणवाडी ताईंचा मेस्मा रद्द करा’ विधानपरिषदेत गोंधळ 

Published On: Mar 21 2018 2:01PM | Last Updated: Mar 21 2018 3:40PMमुंबई : प्रतिनिधी

अंगणवाडी सेविकांनी संपावर जाऊ नये म्हणून त्याना जर सरकार मेस्माखाली आणत असेल. तर इतर सरकारी कर्मचाऱ्यांना जे पगार दिले जातात, त्याप्रकारचे हक्क त्यांनाही द्या, अन्यथा मेस्मा रद्द करा, अशी मागणी शिवसेनेचे अनिल परब यांनी विधानपरिषदेत केली. 

विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे यांनीही त्यास पाठिंबा देत जोपर्यंत मेस्मा रद्द केला जात नाही तोपर्यंत कामकाज चालू देण्याची भूमिका घेतली. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत घातलेल्या गोंधळामुळे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी 23 मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले.

Tags : Anganwadi workers, shivsenasena, NCP, to oppose invoking of MESMA