Sat, Aug 24, 2019 10:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भारत बंदला सेनेचा पाठिंबा नाही: राऊत

भारत बंदला सेनेचा पाठिंबा नाही: राऊत

Published On: Sep 09 2018 6:24PM | Last Updated: Sep 09 2018 6:26PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

इंधनदरवाढीच्या विरोधात काँग्रेसने उद्या (10 सप्टेंबर ) रोजी पुकारलेल्या भारत बंदला शिवसेना पाठिंबा देणार नाही, असे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सांगितले. 

देशातील विरोधी पक्षांना फार उशिरा जाग आली आहे. शिवसेना आधीपासूनच महागाई वाढल्याचे सांगत आहे, असे राऊत म्हणाले. महागाईच्या विरोधातील लढ्यात जेव्हा विरोधक अपयशी ठरतील तेव्हा शिवसेना रस्त्यावर उतरेल, असेही राऊतांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे विरोधकांनी पुकारलेल्या या भारत बंदला महाराष्ट्र नव निर्माण सेनेने पाठिंबा दिला आहे. बंद दरम्यान स्वत: मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत. 

काय म्हणाले राऊत...