Mon, Nov 20, 2017 17:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लैंगिक अत्याचारप्रकरणी मांत्रिकाला अटक

लैंगिक अत्याचारप्रकरणी मांत्रिकाला अटक

Published On: Nov 15 2017 2:07AM | Last Updated: Nov 15 2017 12:26AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

सतरा वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी नागेश भंडारी ऊर्फ नागेश बाबा नावाच्या एका तोतया मांत्रिकाला मंगळवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी पवई पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. मनोरुग्ण असलेल्या पिडीत मुलीला पूजेद्वारे उपचार करण्याचे आश्‍वासन देऊन त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. 

तक्रारदार महिला तिच्या सतरा आणि तेरा वर्षांच्या दोन मुलींसोबत पवई परिसरात राहते. 2012 साली तिची नागेश भंडारीशी ओळख झाली होती. तेव्हापासून तो त्याच परिसरात राहत होता. याच दरम्यान या महिलेला नागेश हा तंत्रमंत्राद्वारे विविध आजारावर उपचार करतो. परमेश्‍वराने त्याला प्रचंड दैवी शक्ती प्रदान केली आहे असे समजले होते. त्यामुळे तिने तिच्या मनोरुग्ण असलेल्या मुलीवर उपचार करण्याची त्याला विनंती केली होती. त्यानेही त्यास होकार दिला. घरात पूजा करावी लागेल आणि पूजेच्या वेळेस तिथे कोणालाही  उपस्थित राहता येणार नाही असे त्याने तिला सांगितले होते. त्यानंतर उपचाराच्या नावाने तो पिडीत मुलीवर लैगिंक अत्याचार करीत होता. काही दिवसांपासून हा लैगिंक अत्याचार असाच सुरु होता. काही दिवसांपूर्वी या महिलेला तिच्या मुलीवर नागेशने लैगिंक अत्याचार केल्याची माहिती समजली होती. तिने सोमवारी पवई पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.