Sun, Jul 05, 2020 11:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ...आणि उध्दव ठाकरेंनी मानले सलमानचे आभार

...आणि उध्दव ठाकरेंनी मानले सलमानचे आभार

Last Updated: Jun 02 2020 8:45AM
मुंबई  : पुढारी ऑनलाईन 

कोरोना संकट काळात अनेक बॉलिवूड कलाकार मदतीसाठी सरसावले आहेत. कुणी आर्थिक मदत करत आहे, तर कुणी मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी पुढे येत आहे. काही जण गरजेच्या वस्तू, अन्न, धान्याचे वाटप करत आहे. सलमाननेदेखील पडद्यामागे काम करणाऱ्यांना मदत देऊ केली आहे. आत पुन्हा त्याने आपले मोठे मन दाखवले आहे. बॉलिवूडचा सुलतान मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी धावून आला. त्यामुळे त्याच्या मदतीची कृतज्ञता व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी सलमानचे मानले आभार आहेत. 

मुंबई पोलिसांना एक लाख हॅण्ड सॅनिटायझरचं वाटप सलमानकडून करण्यात आलं. त्याच्या या कामाचं कौतुक करत महाराष्ट्र सीएम उद्धव ठाकरे यांनी त्याचे आभार मानले आहेत. महाराष्ट्र सीएमओ या ट्विटर अकाऊंटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सलमान खानचे आभार मानले. ठाकरे यांनी एक ट्विटमध्ये म्हटले आहे की, आभार, सलमान खान. आमच्या मुंबई पोलिसांना एक लाख सॅनिटायझर दिल्याबद्दल तुझे धन्यवाद. 

उद्धव ठाकरेंच्या ट्विटला प्रतिक्रिया देत सलमाननेदेखील त्यांना धन्यवाद दिले. या ट्विट्सनंतर सलमानचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्यावर कॉमेंट्सचा पाऊस पडत आहे. शिवाय, लॉकडाऊनच्या काळात पनवेलच्या फॉर्म हाऊसवर असताना तेथूनही सलमानने आवश्यक असणाऱ्या वस्तू बैलगाड्या आणि ट्रॅक्टरमधून वाटप करण्यासाठी पाठवले होते.