Mon, Sep 16, 2019 12:28



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मद्यधुंद तरुणांकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार 

मद्यधुंद तरुणांकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार 

Published On: Mar 05 2018 8:29PM | Last Updated: Mar 05 2018 8:29PM



कल्याण : वार्ताहर

डोंबिवली पूर्वेतील अडवली ढोकळी परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनीवर दोन मद्यधुंद तरूणांनी सामुहिक बलात्कार केल्‍याची घटना समोर आली आहे. विशाल आणि गोपाल अशी संशयितांनी नावे आहेत. या दोघांनी पीडित मुलीला देखील दारू पाजत तिच्यावर अतिप्रसंग केला.

याप्रकरणी  मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करून २४ तासांचा कालावधी उलटून देखील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत. हे दोघे आरोपी याच परिसरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका व्यक्तीच्या जवळचे असल्याचे बोलले जात आहे.