Tue, Sep 17, 2019 03:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पंतप्रधान मोदी राज्यात घेणार आठ सभा

पंतप्रधान मोदी राज्यात घेणार आठ सभा

Published On: Mar 28 2019 3:05PM | Last Updated: Mar 28 2019 3:00PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे युतीच्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदीही प्रचारासाठी महाराष्ट्रात उतरणार असून ते राज्यात आठ प्रचारसभा घेणार आहेत. मुंबईतील सभेत पंतप्रधान मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी एकमेकांवर तोफा डागणारी भाजप-सेना मित्र पक्षांची महायुती राज्यात संपूर्ण ताकदीनीशी मैदानात उतरली आहे. आता या तोफा विरोधकांवर धडाडण्यास सुरूवात झाली आहे. युतीची प्रचाराची धुरा देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे. तरीही त्यांना नरेंद्र मोदींच्या आठ सभांची रसद मिळणार आहे. 

पंतप्रधान मोदींची पहिली सभा 1 एप्रिलला वर्धा येथे होणार आहे. तर शेवटची सभा मुंबईत होणार असून यावेळी उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख यांनी सर्व सहकाऱ्यांसह एकत्र येत कोल्हापुरातून युतीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. संयुक्त मेळावे आणि सभेनंतर आता फडणवीस आणि ठाकरे राज्यात स्वतंत्र सभा घेणार आहेत.  

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex