Wed, Jul 24, 2019 14:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जय श्री राम, आयाराम, गयाराम...! विरोधकांचा राधाकृष्ण विखेंना टोला

आयाराम, गयाराम...! विरोधकांचा राधाकृष्ण विखेंना टोला

Published On: Jun 17 2019 12:02PM | Last Updated: Jun 17 2019 12:11PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

आजपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले. यासाठी नवनिर्वाचित गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधानभवनात येताच विरोधकांनी जय श्रीराम....आयाराम...गयाराम असे आशयाचे फलक हातात घेऊन घोषणा दिल्या.

ज्यावेळी विधिमंडळात मंत्री यायला सुरुवात झाली. त्यावेळी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर जोरदार घोषणाबाजी केली. तसेच मुख्यमंत्री येताचही त्यांनी घोषणा दिल्या. यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधक आणि मुख्यमंत्री असा सामना पहायला मिळाला. 

विशेष म्हणजे गेली साडेचार वर्षे राधाकृष्ण विखे पाटील विरोधी बाकावर बसले. ते आज सरकारमध्ये मंत्री झाल्याने सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना गृहनिर्माण मंत्रिपद देण्यात आले आहे.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शेतकरी विरोधी, जनता विरोधी अशा आभासी सरकारचा निषेध केला, असे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे. 

राज्य विधानसभा निवडणुकीला काही महिने उरलेले असतानाच मंत्रिमंडळात फेरबदल केला. भाजपने आपल्या सहा निष्क्रिय आणि आरोप झालेल्या मंत्र्यांना नारळ देत, दहा नवीन चेहर्‍यांचा समावेश केला. यात राधाकृष्ण विखे ˆ पाटील, मुंबई भाजपचे अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार, डॉ. संजय कुटे, डॉ. अनिल बोंडे, मिरजेचे आमदार सुरेश खाडे, डॉ. अशोक उईके या कॅबिनेट मंत्र्यांचा आणि आमदार योगेश सागर, संजय (बाळा) भेगडे, अतुल सावे आणि परिणय फुके या राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. या सर्व नवनिर्वाचित मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांनी आज विधिमंडळ अधिवेशनात ओळख करून दिली.  

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शेतकरी विरोधी, जनता विरोधी अशा आभासी सरकारचा निषेध केला.#monsoonsession #आभासी_सरकार pic.twitter.com/TU3WBpWnfD

— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 17, 2019