Fri, Mar 22, 2019 03:22
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › १२ तासाच्या बाळावर बलून अँजिओप्लास्टीने उपचार

१२ तासाच्या बाळावर बलून अँजिओप्लास्टीने उपचार

Published On: May 16 2018 7:31PM | Last Updated: May 16 2018 7:33PMनवी मुंबई : प्रतिनिधी 

हार्ट व्हॉल्व्ह अरुंद असल्याने कॉन्जेनिटल हृदय विकार असलेल्या व जन्मतः निळ्या पडलेल्या 12 तासाच्या बाळावर बलून अँजिओप्लास्टीने यशस्वी उपचार केले. यामुळे त्या बाळाला पुनर्जन्म मिळाला आहे. ही शस्त्रक्रिया व उपचार नवी मुंबईतील अपोलो रुग्‍णालयात करण्यात आले. 

अपोलो हॉस्पिटलने पहिल्यांदा नवी मुंबईत टर्टिअरी केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केले आहे. सुमारे 66 पेडिअँट्रिककार्डिअ‍ॅक पेशंटवर विनामूल्य उपचार करण्याचे आश्‍वासन हॉस्पिटलने दिले होते. आज, हॉस्पिटलने अशा 22 बाळांवर उपचार केले असून, त्यातील 11 बाळांवर ओपन हार्ट शस्त्रक्रिया करण्यात आली, तर उर्वरित 11 बाळांवर इंटरव्हेन्शनल उपचार करण्यात आले. या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन अपोलो हॉस्पिटल पात्र कुटुंबांना करत आहे व त्यांची निवड करत आहे. 

नवी मुंबईतील रुग्णालयाने नुकतेच हर्ष तंबोळी या 11 महिन्यांच्या बाळावर उपचार केले. त्याचे निदान केल्यानंतर त्याला तीव्र स्वरूपाचा व्हॉल्व्हुयलर ऑर्टिक स्टेनॉसिस झाल्याचे व प्रिझर्व्ह्ड व्हेंट्रिक्युलर फंक्शन असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर पेडिअ‍ॅट्रिक कार्डिऑलॉजिस्टनी यशस्वी बलून ऑर्टिक व्हॉल्व्होटॉमी उपचार केले. याचबरोबर, जन्मतःच निळ्या पडलेल्या व क्रिटिकल ऑर्टिक व्हॉल्व्ह स्टेनॉसिस असलेल्या बाळावर 15 तासांच्या आत रुग्णालयात एको कार्डिओग्रामच्या मदतीने उपचार करण्यात आले. 

बाळाचा जीव वाचवण्यासाठी इंटरव्हेन्शनची आवश्यकता होती. बाळाला तातडीने बलून अँजिओप्लास्टीसाठी नेण्यात आले व त्यानंतर थोडा कालावधी एनआयसीयूमध्ये ठेवल्यावर बाळाला घरी सोडण्यात आले. अशी माहिती अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेंद्र त्रिवेदी यांनी दिली.