Tue, Jun 02, 2020 22:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खासदार अमोल कोल्हेंनी घेतली राज ठाकरेंची 'मनसे' भेट

अमोल कोल्हेंनी घेतली राज ठाकरेंची 'मनसे' भेट

Published On: Jun 12 2019 1:37PM | Last Updated: Jun 12 2019 6:44PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

विधानसभा निवडणुका तोंडावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी आज, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.

दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

लोकसभेत चौथ्यांदा जाण्याचे शिवाजीराव आढळराव यांचे गणित अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी बिघडवले. आढळराव पाटील यांचा कोल्हे यांनी पराभव केला. आता लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे.