Tue, Dec 10, 2019 13:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी?

...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी?

Published On: Jul 22 2019 1:31PM | Last Updated: Jul 22 2019 1:41PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

भाजप आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. काही दिवसापूर्वी मुख्यमंत्रीपदाबाबत युतीती ५०-५० फॉर्म्युला ठरला असल्याची चर्चा झाली होती. पण काल झालेल्या भाजप मेळाव्यात मुख्यमंत्री पदाच्या चर्चेला वेगळेच वळण लावले. ‘मी शिवसेनेचाही मुख्यमंत्री असून, पुन्हा या पदावर विराजमान होणारच’, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यांच्या याच वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने युतीत फटाकडीची माळ लावली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसने एक व्यंगचित्र आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहे. या व्यंगचित्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यजमान खुर्चीवर विराजमान झाले आहेत. तर खासदार संजय राऊत आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे मुख्यमंत्री खुर्चीला फटाकडीची माळ लावत आहेत. असे हे व्यंगचित्र शेअर करत मुख्यमंत्रीपदाची 'हॉट सीट'..अशी कॅप्शन दिली आहे.

काल झालेल्या मेळाव्यात फडणवीस यांनी आधीच सांगितले आहे, मी पुन्हा येईन!... मी केवळ भाजपचा नाही तर सेनेचा, रिपाईचा, रासपाचा अशा सर्व पक्षांचा मुख्यमंत्री आहे. असे वक्तव्य केले त्यामुळे शिवसेनेला युतीची आस असली तरी भाजप ऐनवेळी एकला चलो रे नारा देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.