Thu, Dec 13, 2018 02:09



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › #MeToo वादळात 'हाऊसफूल-४' ची वाताहत; अक्षय कुमारनंतर आता नाना पाटेकरही चित्रपटातून बाहेर!

#MeToo वादळात 'हाऊसफूल-४' ची वाताहत; अक्षय कुमारनंतर आता नाना पाटेकरही चित्रपटातून बाहेर!

Published On: Oct 12 2018 8:02PM | Last Updated: Oct 12 2018 8:23PM



मुंबई : पुढारी ऑनलाईन 

#MeToo च्या वादळात आगामी हाऊसफुल-४ चित्रपटाची पूर्णपणे वाताहत झाली आहे. सन २००८ मध्ये हॉर्न ओके प्लीज या चित्रपटाच्या सेटवर अभिनेता नाना पाटेकर यांच्याकडून गैरवर्तन झाल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केल्यानंतर संपूर्ण बॉलिवुडच हादरून गेले आहे. तिने केलेल्या आरोपानंतर आता एका पाठोपाठ एक लैंगिक अत्याचाराची प्रकरणे समोर येत आहेत. यामध्ये माध्यमे, राजकारण, बॉलिवुड, कॉर्पोरेट अशा सर्वच घटकांमधून महिलांनी लैंगिक अत्याचाराला वाचा फोडली आहे. 

वाचा : #MeToo दिग्दर्शक सुभाष घईंनी दारू पाजून बलात्कार केला!

वाचा : #MeTooचा आवाज बुलंद; केंद्राकडून गंभीर दखल, तक्रारी हाताळण्यासाठी समिती 

या संपूर्ण आरोपांच्या मालिकेमुळे आगामी हाऊसफुल-४ च्या चित्रपटाचे भवितव्य अंधातरित झाले आहे. या चित्रपटाचा निर्माता साजीद खानवर दोन महिलांनी लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर त्याने चित्रपटातून काढता पाय घेतला. या चित्रपटात प्रमुख भूमिका असलेल्या अक्षयकुमारने सुद्धा साजीद खानवर आरोप झाल्याने चित्रपटातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला. त्याने ट्विटरवरून ही माहिती दिली. आता याच चित्रपटामध्ये आणखी एक प्रमुखेत भूमिकेत असलेल्या नाना पाटेकर यांनी सुद्धा बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यातील वाद न्यायालयात यापूर्वीच गेला आहे. 

वाचा : टाटा मोटर्समध्येही #MeToo चे वादळं; अधिकाऱ्यावर गैरवर्तनाचा आरोप