Sat, Jul 04, 2020 03:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विरार : सेफ्टीक टँकमध्ये गुदमरून तिघांचा मृत्यू (video)

सेफ्टीक टँकमध्ये गुदमरून तिघांचा मृत्यू (video)

Published On: May 03 2019 1:43PM | Last Updated: May 03 2019 2:44PM
विरार : प्रतिनिधी

नालासोपारा पश्चिमेकडील निळेमोरे गावातील आनंद व्ह्यू सोसायटीमध्ये सेफ्टीक टँक साफ करण्यासाठी उतरलेल्या तीन कामगारांचा विषारी वायुमुळे गुदमरून मृत्यू झाला. ही घटना काल घडली. सुनील चवरिया, बिका बुबक, प्रदीप सरवटे अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. तिघेही हनुमान नगर येथे राहणारे आहेत.

या सोसायटीची टँक भरल्याने साफ करण्यासाठी हे कामगार उतरले होते. मात्र, टाकीमध्ये जमा झालेल्या मिथेन विषारी वायुमुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. याबाबतची माहिती रहिवाशांनी अग्निशमन जवानांना दिल्यानंतर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास टँकमधून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. पुढील तपासासाठी तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून नालासोपारा पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, या तीन कामगारांचा झालेला मृत्यू सोसायटी व कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप करून त्यांना नुकसान भरपाईची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली.