Wed, Feb 20, 2019 15:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › MumbaiRain : सोनू निगमच्‍या बंगल्‍याचे नुकसान 

MumbaiRain: सोनू निगमच्‍या बंगल्‍याचे नुकसान 

Published On: Jul 12 2018 12:20PM | Last Updated: Jul 12 2018 12:24PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

स्‍वप्‍ननगरी मुंबईची 'तुंबई' झाल्‍याचे चित्र पाहायला मिळत आहे. सलग मुसळधार पावसामुळे मुंबईतीतल अनेक ठिकाणे पाण्‍याने भरलेली आहेत. तर अनेक रस्‍ते बंद झाले आहेत. जनजीवन विस्‍कळीत झालेले पाहायला मिळत आहे. सामान्‍य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. इतकचं नाही तर प्रसिध्‍द गायक सोनू निगमच्‍या बंगल्‍याचे पावसामुळे नुकसान झाल्‍याची माहिती, सूत्रांकडून मिळाली आहे. 

गायक सोनू निगमचा वर्सोवा येथील बंगल्‍याचे पावसामुळे नुकसान झाले आहे. बंगल्‍याबाहेर असणारी झाडे वारा, पावसामुळे तुटून बंगल्‍याच्‍या आतमध्‍ये पडली. त्‍यामुळे बंगल्‍याचे नुकसान झाले आहे. तसेच ही झाडे कारवर कोसळल्‍याने कारचेही नुकसान झाले आहे. बंगल्‍याच्‍या आतील भागात जिम असून झाडे या भागात पडले आहेत. ही घटना घडली त्‍यावेळी सोनू घरात होते. मात्र, सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. बीएमसीने ही झाडे हटवण्‍यासाठी सहकार्य केल्‍याचे सोनूने म्‍हटल्‍याचे सूत्रांनी सांगितले आहे.