Mon, Jul 06, 2020 01:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई उच्च न्यायालयाकडून डीजेवरील बंदी कायम

मुंबई उच्च न्यायालयाकडून डीजेवरील बंदी कायम

Published On: Sep 21 2018 12:08PM | Last Updated: Sep 21 2018 12:08PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

राज्य सरकारने डीजेवर घातलेल्या बंदीच्या निर्णयाला कायम राखत मुंबई उच्च न्यायालयाने डीजेवरील परवानगी फेटाळून लावली आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्यांचे सुर कानावर  पडणार आहेत. ध्वनिप्रदुषणाच्या मुद्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी फेटाळली.  प्रोफेशनल ऑडिओ आणि लायटिंग असोसिएशनकडून (पाला) राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गेल्या तीन आठवड्यांपासून या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू होती.   

सिस्टीम सुरू करतानाच ध्वनी मर्यादेची पातळी ओलांडली जाते. सुमारे 100 डेसिबलपर्यंत ध्वनी पोहोचतो. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने त्याला परवानगी देण्याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही, असा दावा सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला होता.