Thu, May 28, 2020 12:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › छत्तीस तासानंतरही दिव्यांशुचा शोध सुरूच (video)

छत्तीस तासानंतरही दिव्यांशुचा शोध सुरूच (video)

Published On: Jul 12 2019 11:43AM | Last Updated: Jul 12 2019 1:29PM
मुंबई : प्रतिनिधी

36 तास उलटले तरी अद्याप गोरेगाव आंबेडकर चौक येथून वाहून गेलेला दोन वर्षाच्या दिव्यांशु सिंगचा शोध लागला नसल्याचे समोर येत आहे. अग्निशमन दल आणि एनडीआरएफ पथकाकडून पुन्हा सकाळी शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे. शोधकार्य सुरु करुन दोन तास उलटले. त्यामुळे पीड़ित कुटुंबामध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

अधिक वाचा : तीन वर्षाचा चिमुकला गटारीत पडून वाहून गेला(Video)

मुंबईच्या गोरेगाव परिसरात खुल्‍या गटारीत पडून तीन वर्षाचा दिव्यांशु बुधवारी (दि. १०) वाहून गेला. बुधवारी रात्रभर दिव्यांशुचा शोध घेण्यात आला मात्र अद्‍यापही त्याचा शोध लागू शकलेला नाही. त्यामुळे आज, दुपारपर्यंत दिव्यांशु शोध लागला नाही तर दिव्यांशुचे वडील सूरज सिंग यांनी रास्ता रोको करण्याचा इशारा पुन्हा दिला आहे. 

अग्निशमन दल, आत्पतकालीन विभाग, एनडीआरएफ पथक यांनी 3 ते 4 किलो मीटरपर्यंत मुख्य नाल्यात शोधमोहीम केली, मात्र दिव्यांशुचा नाल्यात शोध लागला नाही. गोरेगांव पूर्वेकडून हा नाला एसव्ही रोड, नाना - नानी पार्क, येथून हा नाला मालाड लिंक रोड इन ऑर्बिट मॉल जवळून नाल्याचा प्रवाह वर्सोवा आणि मार्वे खाड़ीला जाऊन मिळतो. एनडीआरएफ पथकाकडून वर्सोवा आणि मार्वे खाड़ीमध्ये बोटीच्या सहाय्याने शोधकार्य सुरु करणार असल्याची शक्यता आहे.