Wed, Jun 19, 2019 09:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता वाहन विमाही महागला

आता वाहन विमाही महागला

Published On: Oct 12 2018 1:36AM | Last Updated: Oct 12 2018 1:31AMमुंबई : वृत्तसंस्था

गाडी घेण्याचे स्वप्न पाहणार्‍यांना गाडीच्या किमतीच्या तुलनेत 10 टक्के जास्तीचा विमा (इन्श्युरन्स प्रीमियम) भरावा लागणार आहे. न्यायालयाने नुकतेच यासंदर्भात दोन निर्णय दिले असून, त्याचा फटका वाहनधारकांना बसत आहे.

न्यायालयाच्या निर्णयानुसार, थर्ड पार्टी इन्श्युरन्स विमा बंधनकारक करण्यात आला आहे. गाडी चालकांसाठी 15 लाखांचा वैयक्तिक अपघात विमाही बंधनकारक करण्यात आला आहे. या दोन निर्णयांमुळे वाहनधारकांना आधीच्या तुलनेत जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. एखाद्याने दुचाकी गाडी खरेदी केली, तर त्याला पाच वर्षांसाठी थर्ड पार्टी इन्श्युरन्स कव्हर खरेदी करणे बंधनकारक आहे. त्याला वार्षिक वैयक्तिक अपघात विमासुद्धा घेणे बंधनकारक आहे. या दोन कारणांमुळे दुचाकीच्या इन्श्युरन्स प्रीमियरसाठी 10 टक्के रक्कम भरावी लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे वाहनधारकांमध्ये संताप आहे. पेट्रोलचे भाव शंभरी गाठण्याच्या मार्गावर आहेत, तर डिझेल 80च्या घरात गेले आहे. त्यात विमाही महागल्याने अडचणी वाढल्या आहेत.