Mon, Sep 24, 2018 11:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मध्य रेल्वे १० तास, तर हार्बरवरील वाहतूक पाऊण तास ठप्प

मध्य रेल्वे १० तास, तर हार्बरवरील वाहतूक पाऊण तास ठप्प

Published On: Sep 15 2018 2:11AM | Last Updated: Sep 15 2018 2:11AMमुंबई/कसारा : प्रतिनिधी

मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवरील प्रवाशांसाठी शुक्रवार तापदायक ठरला. सकाळी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पहाटेपासून तब्बल 10 तासांहून अधिक काळ ठप्प झाली  होती. त्यापाठोपाठ वाशिंद स्थानकातील रेल रोकोने प्रवाशांची परीक्षा पाहिली. ही वाहतूक संध्याकाळी पूर्वपदावर येत असतानाच कुर्ला स्थानकाजवळ पनवेलकडे जाणार्‍या मार्गावर मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे पनवेलहून कुर्ल्याला जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे सुमारे पाऊण तास प्रवाशांची रखडपट्टी झाली.