Sun, Apr 21, 2019 06:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अयोध्यावारीची सेनेची जोरदार तयारी

अयोध्यावारीची सेनेची जोरदार तयारी

Published On: Nov 10 2018 1:13AM | Last Updated: Nov 10 2018 12:41AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

अयोध्येत प्रभू रामचंद्राचे भव्य मंदिर व्हावे यासाठी आग्रही भूमिका मांडणार्‍या शिवसेनेने येत्या 25 नोव्हेंबरच्या अयोध्यावारीची जोरदार तयारी केली आहे. त्याअगोदर दिवाळीच्या वातावरणात मुंबईत श्रीरामाचा जयघोष दुमदुमणार आहे. उद्या शनिवारी विलेपार्ले येथून श्रीराम नाव कोरलेल्या  विटा घेऊन शिवसैनिक मातोश्रीपर्यंत जयघोष करत निघणार असून, कुर्ला येथे रविवारी ‘एक दीप श्रीरामाच्या नावाने’ भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

शिवाजी पार्क येथील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात चलो अयोध्याचा नारा देण्यात आला होता. त्यानंतर  मुंबई ठाण्यातील शिवसेनेच्या शाखा-शाखांमधून अयोध्येला कोण कोण जाणार याबाबतचे नियोजन करण्यात आले होते. शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे हे स्वत: जातीने अयोध्येतील राम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. तसेच, भव्य राम मंदिराचा पाया रचला जावा यासाठी शिवसेनेची आग्रही भूमिका तेथे मांडली जाणार आहे. 

त्याअगोदर आता दिवाळीच्या सणात मुंबई परिसरात श्रीरामाचा जयघोष ऐकू येणार आहे.  10 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 11 वाजता विर्लेपार्ले येथील सुभाष रोडवरील राम मंदिर याठिकाणावरून शिवसैनिक जितेंद्र जानावळे यांच्या पुढाकाराने शेकडो श्रीराम नाव  कोरलेल्या  विटांची पूजा केली जाणार आहे. त्यानंतर या विटा घेऊन  चालत चालत विलेपार्ले ते वांंद्रे येथील मातोश्री निवासस्थान असा प्रवास शेकडो शिवसैनिक करणार आहे. या विटा उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात येणार आहेत, अशी माहिती जितेंद्र जानावळे यांनी दिली.