Sun, Jul 05, 2020 11:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोरोनासंबंधी चार लसींवर लवकरच वैद्यकीय चाचणी 

कोरोनासंबंधी चार लसींवर लवकरच वैद्यकीय चाचणी 

Last Updated: May 25 2020 8:02PM

file photoनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

जगभरात कोरोनाच्या संसर्गाचा प्रभाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. भारतातही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वेगाने वाढ झाली आहे. देशात त्यामुळे मास्क घालण्यासह सामाजिक अंतर बाळगण्याच्या नियमांचे कडेकोट पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोनावर लस शोधण्याच्या कामाला आता गती मिळाली आहे. कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी १४ लसी प्रभावी आहेत. त्यापैकी ४ लसींवर लवकरच वैद्यकीय चाचणी केली जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.
  
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार जी. व्ही. एल. नरसिम्हा राव यांच्यासोबत नुकताच त्यांनी व्हिडिओ कॉन्फरेन्सच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. सध्या संपूर्ण जग कोरोनावर लस शोधण्याच्या प्रयत्नात आहे. कोरोनावर १०० पेक्षा जास्त लसी प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे. विकासाच्या विभिन्न स्तरांवर त्यांच्यावर काम केले जात आहे. विविध देशांच्या या प्रयत्नांमध्ये जागतिक आरोग्य संघटना देखील समन्वय साधत आहे. भारतही त्यात सक्रियपणे कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली. 

कोरोनावर मात करण्यासाठी कोणत्याही लसीची अपेक्षा करणे सध्या योग्य होणार नाही. लस पूर्णपणे तयार होण्यासाठी जवळपास १ वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे मास्कचा वापर आणि सामाजिक अंतर बाळगण्याच्या नियमांचे कडेकोट पालन करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.