Sun, Oct 20, 2019 07:26



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चालू वर्षापासून वैद्यकीय प्रवेशामध्ये मराठा आरक्षण 

चालू वर्षापासून वैद्यकीय प्रवेशामध्ये मराठा आरक्षण 

Published On: Jul 11 2019 6:56PM | Last Updated: Jul 11 2019 6:56PM




मुंबई : पुढारी ऑनलाईन 

मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी आणखी एक दिलासा मिळाला आहे. यंदापासून वैद्यकीय प्रवेशांमध्ये मराठा आरक्षण लागू  होणार आहे. चालू वर्षापासून पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षणाला विरोध करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्याने आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेसाठी यापूर्वीच प्रारंभ झाल्याने आरक्षण प्रवेश देतानाच लागू होते. त्यामुळे याचिकाकर्त्यांचा  दावा वैध नसल्याचे राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात स्पष्ट करण्यात आले. सरकारची भूमिका न्यायालयाने मान्य केली. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी झाली. 

राज्य सरकारने एसईबीसी कायदा तयार करून मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले.  राज्य सरकारने एसईबीसी कायद्यातील सुधारणा अवैध ठरवण्याची मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली होती. यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु न्यायालयात राज्य सरकारकडून करण्यात आलेला दावा स्वीकारण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षीपासून वैद्यकीय प्रवेशात मराठा आरक्षण लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला.