Tue, Jul 14, 2020 06:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात तातडीची सुनावणी नाही

शिवसेनेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात तातडीची सुनावणी नाही

Last Updated: Nov 13 2019 12:22PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी पुरेशी मुदत न देण्याच्या व राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या विरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या याचिकेवर सुप्रीम कोर्टात तातडीची सुनावणी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्यावतीने काँग्रेस नेते आणि वरिष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल बाजू मांडणार आहेत. न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.

राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिल्यानंतर मुदत संपण्याआधीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. याविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे. यावर आज सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा केला पण तो राज्यपालांनी नाकारला. शिवसेनेची तयारी असतानाही दावा का नाकारला? असा मुद्दा शिवसेनेने याचिकेतून केला आहे. शिवसेनेने राज्यपालांनी सत्ता स्थापनेचा दावा नाकारल्याचे पत्रही जोडले आहे. राज्यपालांनी केवळ २४ तास वेळ दिला. राज्यपालांनी ३ दिवसांचा वेळ वाढवून देण्यास नकार दिला, असे शिवसेनेचे म्हणणे आहे.