Mon, Jun 17, 2019 10:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उर्मिला मातोंडकरच्या रॅलीत 'मोदीं'च्‍या घोषणा; तरुणांना मारहाण (Video)

उर्मिला मातोंडकरच्या रॅलीत 'मोदीं'च्‍या घोषणा; तरुणांना मारहाण (Video)

Published On: Apr 15 2019 3:25PM | Last Updated: Apr 15 2019 3:49PM
मुंबई : प्रतिनिधी

बोरीवली रेल्वे स्टेशनकडे उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांचा नियोजित प्रचार सुरू होता. अचानकपणे रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या ८ ते १० तरुणांनी 'मोदी...मोदी'च्या घोषणा दिल्या. यामुळे समोरून आलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही 'गोपाळ शेट्टी चोर है'च्या घोषणा देत या तरुणांना मारहाण करण्यास सुरुवात केली. परिस्थिती चिघळू नये, म्हणून स्टेशनवरील उपस्थित पोलिसांनी दोन्ही गटांना शांत केले. त्‍यामुळे पुढील घटना टळली. याप्रकरणी उर्मिला मातोंडकर यांनी बोरिवली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. 

प्रचार रॅलीमध्ये अचानक घुसलेल्या या तरुणांकडे भाजपचे कुठलेही झेंडे व प्रचार साहित्य नव्हते. त्‍यामुळे या तरूणांना याठिकाणी कुणी पाठवले. या घटनेमागे कोण आहे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.  

उत्तर मुंबईतील विद्यमान भाजप खासदार गोपाळ शेट्टीविरोधात काँग्रेस पक्षाने अभिनेत्री उमिला मातोंडकर यांना उमेदवारी दिल्याने त्यांचा मतदार संघात प्रतिसाद वाढत आहे. यामुळे खासदार शेट्टी आणि भाजप कार्यकर्ते बिथरले आहेत. त्यांच्याकडे दुसरा कुठलाही विषय नसल्याने अशाप्रकारे त्याच्याकडून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.