Tue, Nov 12, 2019 14:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वडाळ्यात चिमुरडीवर अत्याचार; नराधमासह तिच्या आजीला अटक

वडाळ्यात चिमुरडीवर अत्याचार; नराधमासह तिच्या आजीला अटक

Last Updated: Oct 20 2019 1:26AM
धारावी : प्रतिनिधी 

11 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याप्रकरणी 45 वर्षीय नराधमासह चिमुरडीच्या आजीला  वडाळा टी टी पोलिसांनी अटक केल्याची घटना गुरुवारी घडली आहे. याप्रकरणी शफिक नावाच्या नराधमावर बलात्काराचा तर चिमुरडीच्या आजीवर अत्याचारी नराधमाला साहाय्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक संतोष कोकरे महिला पोलीस उपनिरीक्षक दीपाली परदेशी अधिक तपास करत आहेत. 

वडाळ्यात भारतीय कमला नगर परिसरात राहणारी चिमुरडी घरात आजीसह बसली असताना शेजारी राहणारा शफिक झाडाझुड करण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरात घुसला. आजीसमोर चिमुरडीला ओढत नेवून तिच्याशी जबरदस्ती करू लागला. चिमुरडी वेदनेने किंचाळत होती. घरातच बसलेल्या आजीने तिच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. चिमुरडीच्या किंचाळण्याच्या आवाजाने घरचे गोळा झाले. त्यांनी नराधमाला पकडण्याचा प्रयत्न करताच शफिकने पोबारा केला. 

पो.नि. कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दीपक कदम, अरुण उघाडे, रमेश आहेर, नितीन भामरे यांनी सदर नराधमाचा कसून शोध घेत त्याला अँटॉपहील परिसरातून अटक केली.