Tue, Sep 17, 2019 04:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात मराठा आरक्षणासाठी जन सुनावणी 

ठाण्यात मराठा आरक्षणासाठी जन सुनावणी 

Published On: May 08 2018 3:03PM | Last Updated: May 08 2018 3:03PMठाणे: प्रतिनिधी

सकल मराठा समाजाला आरक्षण का देण्यात यावे, मराठा समाजाला आरक्षणाची किती गरज आहे... याची चाचपणी करण्याकरता राज्यभरात मराठा आरक्षण जन सुनावणी घेण्यात येत आहे. त्याअनुषंगाने आज ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जन सुनावणी घेण्यात आली. आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती एम. जी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी घेण्यात आली. 

यावेळी मराठा समाज आर्थिक, शैक्षणिक, सामाजिकदृष्ट्या कसा मागासलेला आहे, याबाबत पुराव्यांसह निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा समाजाला आरक्षण देऊ नका अशा विविध प्रकारची निवेदनेही या आयोगा समोर देण्यात आली. 

मुळात मराठा समाजाच्या लोकांची निवेदने स्विकारण्यासाठी त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी ही जाहीर सुनावणी घेण्यात आली असून इतर समाज कसं काय निवेदन देतो असं सांगत सुनावणीस आलेल्या मराठा समाजाच्या लोकांनी आयोगाची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली.  आयोगाने त्यांची समजूत काढल्याने मराठा समाजाच्या लोकांचे समाधान झाले आणि एक मोठा वाद टळला. या सुनावणीचे अर्ज राज्यात सुनावणी सुरु असेपर्यंत निवेदने स्वीकारली जाणार आहेत.

Tags : jan sunavani, maratha reservation, thane, Mumbai news


 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex