Mon, Jul 06, 2020 02:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तब्बल ७५ दिवसानंतर जळगाव सराफ बाजाराने घेतली उसळी; पहिल्याच दिवशी 'एवढ्या' कोटींची उलाढाल   

तब्बल ७५ दिवसानंतर जळगाव सराफ बाजाराने घेतली उसळी; पहिल्याच दिवशी 'एवढ्या' कोटींची उलाढाल   

Last Updated: Jun 06 2020 3:42PM

संग्रहित छायाचित्रनवी मुंबई : पुढारी वृत्तसेवा 

लॉकडाऊननंतर तब्बल ७५ दिवसानंतर शुक्रवारी जळगावातील सोने बाजार खुला झाला. काल एका दिवसात ४७ हजार ३०० रूपये तोळे सोन्याचा दर असताना आठ कोटी रूपयांचे सोने ग्राहकांनी खरेदी केले. आज शनिवारी या दरात तोळ्यामागे सोने ८०० रूपयांनी घसरले. शनिवारी सोने ४६ हजार ५०० दर आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर सोने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. ही गर्दी अपेक्षित होती. अशी माहिती बाफना ज्वेलर्सचे मालक सुशील बाफना यांनी पुढारीशी बोलताना दिली.

वाचा : आदिवासी मुलांच्या लसीसाठी सिध्दीविनायक मंदिराकडून १० कोटींचा निधी

७५ दिवसानंतर राज्य सरकार व जिल्हाधिकारी आणि पालिका प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार प्रसिद्ध असलेल्या जळगावातील सोन्याची दुकाने सम व विषम तारखेला सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शुक्रवारी पहिल्याच दिवशी सोन्याची दुकाने खुले होताच १०.३० वाजल्यापासून ५ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर ग्राहकांनी गर्दी केली. शुक्रवारी सोन्याचे दर प्रती १० ग्रॅम ( एक तोळ्यासाठी) ४७ हजार ३०० रूपये होते. संध्याकाळीपर्यंत सुमारे आठ कोटी रूपयांची उलाढाल जळगाव सराफ बाजारात झाल्याची माहिती सुशील बाफना यांनी दिली. अजूनही ग्रामीण भागात घरात, कोर्टात विवाह होत आहेत. त्यामुळे येत्या महिन्याभरात ९,१५,१८,२५ जून या तारखांना विवाह कार्य होऊ घातले आहेत. खानदेशात एका सर्व सामान्य कुटुंबातील विवाह असला तरी किमान लाखभर रूपयांचे सोने खरेदी केले जाते. बागायतदार, नोकरदार वर असल्यास किमान तीन ते ६ लाख रूपयांचे नवीन प्रकारच्या डिझाईनचे दागिने खरेदी केले जातात.

पश्चिम महाराष्ट्रसह कोकणात, विदर्भातही जळगावच्या सोन्याला वाढती मागणी आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांनी ऑर्डर प्रमाणे दागिने बनविणे थांबवले होते. ते आता सुरू होण्यास सुरूवात होईल. शनिवारी दुसऱ्या दिवशी ही गर्दी त्याचपट्टीने बाजारात आहेत. शनिवारी सोने तोळ्यामागे ८०० रूपयांनी घसरले. त्यामुळे सोन्याचा प्रती तोळ्याचा दर ४६ हजार ५०० होता. एक दिवसात सोने ८०० रूपये तोळ्यामागे घसरल्याने ग्राहकांची गर्दी वाढण्याची शक्यता असल्याचे सुशील बाफना यांनी सांगितले.

सराफ बाजारात राज्य सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन केले जात आहे. सर्व ग्राहकांचे टेंम्परेचर तपासून त्यांना प्रवेश दिला जातो. सॅनिटायझर, हॅन्ड गोल्ज, वॉशबेशिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

वाचा : स्पाईस जेटची विमान कंपनीची शिडी इंडिगो विमानाच्या पंखात घुसली!