Sun, Jul 05, 2020 13:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवी मुंबईत मुसळधार पावसाच्या सरी (video)

नवी मुंबईत मुसळधार पावसाच्या सरी (video)

Last Updated: Jun 04 2020 11:30AM
नवी मुंबई : पुढारी वृतसेवा 

नवी मुंबईत बुधवारी सकाळी साडेआठ ते गुरूवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत 24 तासात सरासरी 76.08 मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पावसाची नोंद बेलापूर विभागात झाली असून 57.30 मिमी पाऊस या विभागात झाला. तर मोरबे धरण क्षेत्रात 56.00 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पनवेल,उरणसह नवी मुंबईकरांना पावसाने झोडपले. 

बुधवारी चक्रीवादळामुळे स्थलांतरीत केलेले 562 मजुर नेरूळ, ऐरोली ,सानपाडा आणि बेलापूर येथील महापालिका शाळांमध्ये ठेवण्यात आले आहेत. गुरूवारी मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली असल्याने या नागरिकांना शाळेत ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. बुधवारी रात्री उशीरा महापालिका आयुक्त आण्णा साहेब मिसाळ यांनी नेरूळ येथील एलआयजीतील सहा घरांवर झाडे पडल्याने घरांच्या नुकसानीची घटनास्थळी जाऊन पाहणी केली.  

सर्व  विभाग अधिकारी, अभियंता,  स्वच्छता निरिक्षक यांच्यासाठी दोन परिमंडळात उपायुक्त यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली. रात्रभरात कुठेही पाणी साचणे, झाडे पडण्याच्या घटना घडली नाही.  कोरोनामुळे मोकळ्या मैदानात फिजिकल डिस्टिसिंगसाठी भाजीपाला मार्केट भरविण्यात आले होते. मात्र मुसळधार पावसामुळे अनेक प्रभागातील भाजी मार्केट मध्ये तुरळक विक्रेत्यांनी हजेरी लावली. पावसामुळे मैदानात दलदल  झाल्याने ग्राहकांसह किरकोळ विक्रेत्यांचे प्रचंड हाल झाले.

शहरात एनएमएमटी, रिक्षा,लोकल सेवा बंद असल्याने प्रवाशांची कुठेही गर्दी दिसून येत नव्हती. सर्व रेल्वे स्थानक, बस डेपो, रिक्षा स्टॅंड ओस पडले आहे. एपीएमसीत एकाच ट्रक,टेम्पो मधून मुंबईतील किरकोळ व्यापारी माल खरेदी करण्यासाठी आले. सकाळच्या पहिल्या सत्रात 329 गाडी व थेट गेलेल्या 174 अशा 503 गाडी भाजीपाला व 21 गाड्या मुंबईत  फळांच्या मुंबईत दाखल झाल्या. भाजीपाला मार्केट मध्ये केवळ गुरूवारी 91, कांदा बटाटा 17 आणि फळांच्या 70 गाड्यांची आवक झाली. पाच मार्केट मिळून केवळ 350 गाड्यांची आवक झाली. एपीएमसी आवकवर मुसळधार पावसाचा परिणाम दिसून आला.   

    
बेलापूर 57.30 मिमी

नेरूळ  54.30मिमी

वाशी  54.20मिमी

कोपरखैरणे  53.40 मिमी 

ऐरोली  46.20मिमी

सरासरी  53.08 मिमी 

एकूण पावसाची नोंद  76.08 मिमी 

मोरबे धरण क्षेत्रात पाऊस

रोजचा पाऊस - 34.00 मिमी

एकूण पाऊस - 56.00 मिमी 

धरणाची पातळी - 73.76 मी