Tue, Jan 22, 2019 07:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शासकीय कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा केला धनादेश परत 

शासकीय कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा केला धनादेश परत 

Published On: Nov 09 2018 1:34PM | Last Updated: Nov 09 2018 1:34PMमहाड : पुढारी ऑनलाईन 

महाड तालुक्यातील बिरवाडी मधील रायगड जिल्हा परिषदेच्या  पशुवैद्यकीय दवाखान्यामधील शिपाई संजय पांडुरंग पवार (वय ५२ रा दुधाने आवाड बिरवाडी) यांनी प्रामाणिकपणाचे दर्शन घडून रस्त्यांमध्ये सापडलेला दोन लाख ३५ हजार रुपयांचा रोख धनादेश लक्ष्मण भागोजी दिवेकर  यांच्याकडे सुपूर्त केला आहे .

याबाबतचे सविस्तर माहिती अशी की, महाड तालुक्यातील लक्ष्मण भागोजी दिवेकर (वय २८ रा खेराट) यांचा अॅक्सिस बँकेचा  २ लाख ३५ रुपयांचा रोख धनादेश बिरवाडी ते महाड प्रवासा दरम्यान ५ नोव्हेंबर २०१८ रोजी पडला होता. तो बिरवाडी ग्रामपंचायती मधील रायगड जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय  दवाखान्यातील शिपाई संजय पवार यांना सापडला. त्यांनी आपले मित्र विनोद भालेकर यांच्या मदतीने लक्ष्मण भागोजी दिवेकर यांचा शोध घेऊन त्यांना त्यांचा धनादेश सुपूर्त करीत प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे.

त्यांच्या या कामगिरीबद्दल महाडचे आमदार भरत गोगावले, महाड पंचायत समितीचे सभापती सौ सपना सुभाष मालुसरे रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज काळीजकर संजय कचरे, पशुवैद्यकीय अधिकारी यांनी त्यांचे कौतुक केले आहे .