Fri, Oct 20, 2017 08:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजप उपाध्यक्ष विजय कांबळेंना गंडवणारा भोंदूबाबा गजाआड

भाजप उपाध्यक्षांना गंडवणारा भोंदूबाबा गजाआड

Published On: Oct 12 2017 8:52PM | Last Updated: Oct 12 2017 8:52PM

बुकमार्क करा

पनवेल : वार्ताहर

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व ज्येष्ठ कामगार नेते विजय कांबळे यांना. 1 कोटी 70 लाख रूपयांना गंडा घालणारा भोंदूबाबा उदयसिंग प्रतापराव चव्हाण उर्फ महाराज याला कामोठे पोलिसांनी अखेर जेजुरीतून गजाआड केलेे.

कामोठे वसाहतीत राहणार्‍या या बाबाने केंद्रातील तसेच राज्यातील महामंडळावर वर्णी लावून देण्याचे अमिष दाखवून कामगार नेते विजय कांबळे यांच्याकडून 1 कोटी 70 लाख रूपये घेतले होते.  काबंळे यांचा मुलगा जितेंद्र हा नृत्य दिग्दर्शक असून, दोन वर्षापुर्वी एका मित्राने जितेंद्रची उदयसिंग महाराजसोबत ओळख करून दिली होती. यानंतर दोघांच्या गाठीभेटी वाढत गेल्या. उदयसिंग महाराज यांनी आपले केद्रात तसेच राज्यातील वरिष्ठ अधिकारी तसेच नेत्यासोबत चांगले संबंध असल्याचे जितेंद्रला  सांगितले. शिवाय राज्यात किंवा केंद्रात कोणत्याही महामंडळावर वर्णी लावण्याचे अमिषही दाखवले. जितेंद्रने मग वडलांना बाबाची महती सांगितली आणि विजय कांबळेही बाबाला भुलले. महामंडळावर वर्णी लागावी म्हणून त्यांनी तब्बल 1 कोटी 70 लाख रुपये आरटीजीएसद्वारे उदयसिंग बाबाला दिले. त्यानंतर दोन वर्षे उलटली तरी विजय कांबळे महामंडळावरील नियुक्‍तीची वाट बघतच होते. महामंडळ मिळत नसेल किमान बाबाला दिलेले पैसे तरी परत मिळावेत असा विचार विजय कांबळेंनी केला आणि मग त्यांनी बाबाकडे  तगादा लावण्यास सुरुवात केली.

उदयसिंग पैसे परत देत नसल्याचे पाहून विजय कांबळेंनी सहा महिन्यांपूर्वी उदयसिंग विरोधात कामोठे पोलिसांत तक्रार दाखल करताच उदयसिंगने पळ काढला. न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळला होता. उदयसिंग जेजूरीमध्ये दडून बसल्याची माहिती कामेठे पोलिसांना मिळताच, तेथे अकस्मात धडकत  बाबाला अटक करण्यात आली. गुरुवारी न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. उदयसिंग याच्याविरोधात  नवी मुबंई पोलिस ठाण्यात अनेक गुन्हयांची नोंद असून, राज्यात अन्य ठिकाणी त्याच्याविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.